पुण्याच्या भोर तालुक्यातील नऱ्हे गावात मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर असल्याने घबराट उडाली आहे. बिबट्या जंगल परिसर सोडून लोकवस्तीकडे येत आहेत.विशेषतः रात्रीच्या वेळी त्यांचा संचार वाढतोय.पाळीव प्राण्यांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांच्या सुरक्षितेसाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.