पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे पुणे ते माजलगावच्या एसटी बसचे चालक आणि वाहक यांना तिघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वाहकाच्या खिशातून २१,००० रुपये लंपास करण्यात आले. या घटनेनंतर शिरूर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.