मुसळधार पावसाने पुणे–नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी परिसर जलमय झाला आहे. महामार्गावर पाणी आल्याने रात्रीपासून वाहतूक पूर्णपणे बंद असून हजारो वाहनचालक आणि चाकण एमआयडीसीकडे जाणारे कामगार अडकून पडले आहेत.