आज अंगारक चतुर्थीनिमित्त अष्टविनायक ओझर नगरी सजली असून ओझरच्या विघ्नहर बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आलाय. पहाटेची महापूजा झाल्यानंतर गणेश याग महाआरती संपन्न झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. देवस्थान ट्रस्ट कडून आज चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.