पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बकरी ईदचा सण शांतता, उत्साह आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला आहे. येथील ऐतिहासिक दिलावर खान दर्गा मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले आणि सामुदायिक नमाज अदा केली. सकाळपासूनच दर्गा परिसरात मुस्लिम बांधवांची गर्दी पाहायला मिळाली, तर एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला. प्रशासनाच्या देखरेखीखाली आणि पोलिस बंदोबस्तात संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.