इंदापूर येथे पार पडलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पवित्र रिंगण सोहळ्यास डी. वाय. पाटील यांच्या नात तथा डी. वाय. पाटील ग्रुपच्या व्यवस्थापकीय विश्वस्त राजलक्ष्मी विजय पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वारकरी परंपरेला अभिवादन करत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेप्रती आदर व्यक्त करीत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सामाजिक ऐक्य, समता आणि भक्तीच्या संदेशाला सलाम केला.