पुण्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा तडाका वाढला आहे. वाढलेल्या उन्हाचा मेंढ्यांसह मेंढपाळांवरही परिणाम झाला आहे.उन्हामुळे पूर्वेकडील भागातून पुण्याच्या भोर तालुक्यात आलेल्या मेंढपाळांची, मेंढ्यांच्या चारा- पाण्यासाठी डोंगर तसेच शेत शिवारात भटकंती सुरु आहे. उन्हाच्या झळांनी मेंढ्यांसहित मेंढपाळ हैराण झाले असल्याने दुपारच्या वेळी झाडाझुडपांच्या सावलीचा आधार घेऊ लागले आहेत.