पुण्याजवळील भोर तालुक्यातील रोहिडेश्वर किल्ल्यावरील प्रसिद्ध वाघजाई माता मंदिरात माघी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. अवघड पायवाटेने पारंपरिक वाद्यांच्या गजरात काठीपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाआरती, मूर्तीपूजन, आणि अभिषेक यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'वाघजाई माता की जय'चा जयघोष करत हजारो भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला.