नीरा नदीकाठी पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर नीरा येथील दत्त घाटावर होणाऱ्या कीर्तन महोत्सवाला काल सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे.कीर्तन महोत्सवासाठी बांधण्यात आलेल्या मोठ्या मंडपाचे कापड या वादळी वाऱ्याने फाटून गेले. त्यामुळे आयोजकांचे मोठं नुकसान झालं आहे. नीरा-पडेगाव पंचक्रोशी आणि पुरंदर,बारामती,फलटण, खंडाळा या चार तालुक्यातील ग्रामस्थानी या कीर्तन महोत्सवाच आयोजन केले होते.आजच हा कीर्तन महोत्सव सुरू होणार असल्याने पुन्हा मांडव उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.