पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. पिंपरी चिंचवड पोलीस तिचा ताबा मागणार आहेत. मुद्रांक शुल्क चुकवल्या प्रकरणी शीतल तेजवानीसह दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल आहे. सरकारी वकिलांनी पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.