शिरूर तालुक्यातील येवले माथा परिसरात सायंकाळी ट्रॅक्टरसमोर अचानक बिबट्या दिसल्याने शेतकरी भयभीत झाला. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक ग्रामीण भागात, विशेषतः शेतकरी, मेंढपाळ आणि महिला वर्गात प्रचंड दहशत पसरली आहे. अंधार पडल्यावर बाहेर पडणे टाळले जात आहे. वन विभागाने तातडीने पिंजरे लावून गस्त वाढवावी आणि जनजागृती करावी अशी स्थानिकांची मागणी आहे.