शिरूर तालुक्यातील धामारी येथे म्हाळसाकांत खंडेरायाचा यात्रा उत्सव सुरू आहे. यात्रा उत्सवानिमित्त भाविक भक्तांनी कुलदैवताचा तळीभंडार करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून सोडला. चार दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.