शिरुर तालुक्यातील पारोडीत शेतामध्ये भुईमुगाची काढली सुरु झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात बदल जाणवू लागला असून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी पावसापूर्वी भुईमूग काढणीची कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत. शिरूर तालुक्यातील पारोडी येथे शेतांमध्ये सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..