पुणे : शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील गुणवंतवाडी परिसरात एक भलामोठा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच सर्पमित्र संदीप गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेत कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या या अजगराला पकडले.