शिरूर तालुक्यात वनविभागाच्या मोहिमेला मोठं यश मिळालं असून अवघ्या दोन दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. पिंपळे धुमाळ येथे एका पिंजऱ्यात तब्बल दोन बिबटे अडकले असून त्यामध्ये पाच वर्षांची मादी आणि तिच्या दीड वर्षांच्या पिल्लाचा समावेश आहे.