मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा मंदिराला लक्ष्य करत तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील चांदीचा मुकुट लंपास केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेला हाच मुकुट पोलिसांनी हस्तगत करून काल पुन्हा देवीला परिधान केला होता. आता तो पुन्हा चोरीला गेला आहे.