पुणे - पुण्याच्या राजगड तालुक्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने सुरू असलेलं रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.रस्त्यावर टाकलेले डांबर काठीने उकरून दाखवत एका स्थानिक नागरिकाने हे काम किती बेफिकिरीने, तांत्रिक निकषांचे उल्लंघन करून केले जात असल्याचे दाखवले आहे.