पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमा निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दोन दिवस भरणाऱ्या या यात्रेत हजारो भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात नवसाची जागरणे करीत तळी भंडाऱ्याची उधळण करीत यावेळी पुजा केली गेली. यात्रेमध्ये शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या वस्तूंपासून विविध खेडळ्यांची दुकाने आणि हॉटेल थाटली आहेत. या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली, यात्रेनिमित्त नवसाच्या बैलगाडा शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले असून करमणुकीसाठी रात्री लोककला तमाशा देखील ठेवण्यात आला आहे.