पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मॅनेजरच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात घरात दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दुधवाल्यानेच चोरी केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव व्यंकटेश करंडे असे आहे. घरातून 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून घरावरील डिजिटल लॉकचा पासवर्ड टाकून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर 17 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पासवर्ड सापडताच त्याने घरात प्रवेश करून रोकड लंपास केली.