सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक सिंहगडावर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'अशा दणदणीत घोषणांत सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने या तीन तोफगाड्यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. अनेक वर्षांपासून सिंहगडावरील या तोफा उघड्यावर आणि जमिनीला टेकलेल्या होत्या. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने सागवानी गाडे बसविण्यात आले आहेत. हे तोफगाडे सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी अथक परिश्रमाने गडावर पोहचवले आहेत.मान्यवरांच्या हस्ते तोफगाड्यांचे पूजन करून हे लोकार्पण करण्यात आले.या लोकार्पण सोहळ्यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवघोषणांनी संपूर्ण सिंहगड परिसर दुमदुमून गेला.