टोमॅटोचे हब असणाऱ्या नारायणगाव टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोच्या 11 हजार 600 क्रेटची आवक झाली असून प्रतवारी नुसार टोमॅटोला दहा ते वीस रुपये प्रति किलोला बाजारभाव मिळाला आहे. एकीकडे वाढत्या उन्हात व तापमानात टोमॅटो पीक जगविणे शेतकऱ्यासाठी अवघड व खर्चिक बनले असून त्यातच बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.