पुणे शहरातील प्रमुख असलेल्या वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दुःखाच्या प्रसंगी आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबीयांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केलाय.