पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मधील पाषाण, सोमेश्वरवाडी येथील नागरिकांनी अजित पवारांना बॅनरद्वारे प्रश्न विचारला आहे. १८ वर्षांच्या निष्ठेनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करून निराशा पदरी आल्याची त्यांची भावना आहे. 'अजित दादा आमचं काय चुकलं?' असे बॅनर लावून मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.