पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटल्याने प्राचीन पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आले आहे. धरणात केवळ 6 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने,पाणलोट क्षेत्रातील नदी पात्रात असलेले काबंरे गावातील कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर आले आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी आहेत. हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी इतिहास संशोधक, अभ्यासक आणि नागरिक आवर्जून या मंदिराला भेट देत असतात. हे मंदिर दहा महिने पाण्यात असते. धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यावर, मे महिन्याच्या शेवटी हे मंदिर पाण्याबाहेर येते.