पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पहाटे आणि रात्रीची थंडी असाह्य झाल्याने शेतकरी, मजूर आणि स्थानिक लोक थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. उबदारपणा शोधत आहेत. शहरात शेकोट्यांना बंदी असली तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविलेल्या पाहायला मिळत आहेत.