पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावात ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला होता. या कुस्ती स्पर्धांमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या 180 पैलवानांनी भाग घेतला. भोंगवली ग्रामस्थ मंडळाकडून भरविण्यात आलेला हा निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.