पुण्याच्या भोरमधील उत्रौली गावात यमाई देवीची यात्रा उत्साहात संप्पन्न झाली.देवीच्या यात्रेनिमित्त काठी पालखीची आणि छबिना मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या तालावर गावातून काढलेल्या या काठी पालखीच्या मिरवणूकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. मिरवणूकी दरम्यान आसपासचा परिसर देवाच्या नामघोषात, ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.यावेळी मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी पालखी प्रदक्षिणा, छबीना, अभिषेक, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचही आयोजन केले होते.