पुणे पालिकेनंतर पुणे जिल्हा परिषद (झेडपी) निवडणुकीतही भाजप आणि शिवसेनेची युती अखेर तुटली आहे. जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती विजय शिवतारेंनी दिली. शिवसेना जिल्ह्यातील ७३ जिल्हा परिषद आणि १४६ पंचायत समिती जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तीव्र लढत अपेक्षित आहे.