यमाई शिवरी येथील समर्थ महाराज गुरु पादुका मठात स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. संपूर्ण परिसरात तीन दिवस अखंड नामस्मरण, हवन आणि पारायण सेवेमुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.प्रकट दिनाच्या पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महापूजा आणि अभिषेक सोहळा संपन्न झाला.