सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मच्छिमारी करून बंदरात परतत असताना "अलमका" ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडाली. या नौकेवर तांडेलासह सुमारे १५ ते २० खलाशी होते. वाऱ्याचा वाढलेला वेग आणि उंच लाटांमुळे नौकेचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली.