यवतमाळच्या दारव्हा शहर आणि ग्रामीण भागात सध्या घरगुती व व्यवसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, कडाक्याच्या उन्हात नागरिक भल्या पहाटेपासून रांगा लावत आहेत. मात्र तासनतास थांबूनही गॅस मिळत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.