वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर संकट आले आहे. फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांना ओलावा वाढून रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट होऊन शेतकरी आर्थिक चिंतेत सापडले आहेत, त्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.