वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळेत दाट धुके आणि ढगाळ वातावरण कायम आहे. या हवामान बदलाचा मोठा फटका रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांना बसत आहे. धुक्यामुळे वातावरणात ओलसरपणा वाढल्याने पिकांवर किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली असून शेतकरी फवारणीकडे वळले आहेत. याच धुक्याचा परिणाम रस्त्यांवरही दिसून येत असून वाहनधारकांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेती आणि वाहतूक दोन्ही प्रभावित झाल्याचे चित्र आहे.