धुळे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा आणि मका ही पिकं धोक्यात आली आहे. या पिकांवर रोगराई पसरली असून शेतकऱ्यांकडून फवारणी केली जात आहे. गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळी तर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे