गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो.खरीपसोबतच रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात धान लागवड केली जाते.यंदा रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे 6 हजार 200 हेक्टरवर धानाची नर्सरी तयार करण्यात आली आहे. एकूण 65 हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या 23 हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी दिली.दरम्यान, शेतकरी मका आणि भाजीपाला यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळत असल्याने यंदा धान लागवडीच्या क्षेत्रात काहीशी घट होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.