रायगड जिल्ह्यातील उरण नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर राडा पाहायला मिळाला. नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुममध्ये घुसला. दरम्यान, यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अक्षेप घेतला. तर मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना इसम स्ट्राँग रुममध्ये गेला कसा ? असा सवाल भावना घाणेकर यांनी तहसीलदारांना केलाय.