स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड जवळ भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यानंतर परिसरात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला. या राडा प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.