नवी मुंबईत ओला चालक आणि प्रवाशामध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिलाले. नवी मुबंईतील सीवूड्स येथे राड्याची घटना घडली. आधी ओला चालक आणि प्रवाशामध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली आणि नंतर या भांडणाचे रूपांतर थेट हाणामारीमध्ये झाले. यावेळी ओला चालकाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली तर. घटनची एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.