नालासोपारा पेल्हार जिल्हापरिषद मतदान केंद्रावर साडे पाचनंतर मतदान न करू दिल्यामुळे राडा झाला. वॉर्ड क्रमांक 19 मध्ये पेल्हार जिल्हापरिषद मतदान केंद्र आहे. दिवसभरात 5 ते 6 वेळा मशीन मध्ये बिघाड झाल्याने अनेक मतदारांचे मतदान शिल्लक होते.