राहुल नार्वेकर यांनी वॉर्ड २२५ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वर्चस्वावर विश्वास व्यक्त केला आहे. मागील निवडणुकीत साडेबारा हजार मतांची आघाडी मिळाल्याचे सांगत, हा वॉर्ड भाजपचा बालेकिल्ला असल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत कुणीही अर्ज भरला तरी चिंता नसल्याचे सांगत, कुलाब्यात सर्वाधिक मताधिक्य मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.