मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या यशासाठी, महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येण्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आणि मुंबईच्या निरंतर विकासासाठी प्रार्थना केली. त्यांनी मराठी मतदारांना भावनिक आवाहनही केले.