अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी शिर्डीत साई दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे ईव्हीम मशीन राहुरी महाविद्यालयात बनवलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. या स्ट्राँग रूम परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याचा पोलीस अधिक्षक सुदर्शन यांनी आढावा घेतला. पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. 4 मे रोजी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे.