शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरुन-लपून सुरु असलेल्या गावठी हातभट्टी चालकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील कब्रस्तानच्या पाठीमागे, तसंच चिमठाणे पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील दराणे गावाच्या शिवारात गावठी हातभट्ट्यांवर कारवाई झाली. तब्बल पन्नास हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली.