रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मालाड येथील उत्कर्ष मंदिरच्या विद्यार्थ्यांसोबत शेतात उतरून भातलागवड केली. विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी करत त्यांनी भाताची लागवड केली. यावेळी राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.