रायगड जिल्ह्यातील रोहा, नागोठणे आणि वाकण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, माणगाव, लोणेरे आणि महाड परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.