रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चणेरा भागातील खारखर्डी पारनखार गावात दोन तरुण आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गावात सुसाट वेगाने मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांना “हळू जा” असे सांगितल्याचा राग मनात धरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.