रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून पाणीटंचाईचे एक अत्यंत हृदयद्रावक वास्तव समोर आले आहे. ढोकशेत आदिवासी वाडीतील पुतळी पवार… एक निराधार, वयस्कर महिला… जगण्यासाठीच्या अत्यावश्यक पाण्यासाठी रोज अक्षरशः लढा देत आहेत.