रायगड जिल्ह्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाड तालुक्यातील चांधवे खुर्द 54 खरवली जिल्हापरिषद 108 पंचायत समिती गण येथील नवरा मुलगा विशाल उतेकर याने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचा संदेश दिला आहे. लग्नाची हळद सुरू असतानाही वेळ काढत विशाल उतेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.