जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रायगडमध्ये राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने किल्ले रायगडावर विधीवत पुजा करून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. मंत्री भरत गोगावले यांच्या पत्नीसह अनेक उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी जगदीश्वर मंदिरात पूजा करून, शिवसमाधीसमोर नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला.