किल्ले रायगडाच्या पायथ्याशी, पाचाड येथे राजमाता जिजाऊंचा ४२७ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. रायगड जिल्हा परिषद व पाचाड ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या सोहळ्याला कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगवले प्रमुख उपस्थित होते. शिवभक्त, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव अविस्मरणीय बनवला.